अमेरिकेत समाजशास्त्रज्ञ किन्से याने स्त्रियांची दु:खे समजून घेण्याकरिता पाहणी करून `ऊप एाम्दह् ेंदर्स्ीह' या अहवालात ९९ टक्के अमेरिकन स्त्रियांचे दु:ख `आपला नवरा दुसर्या बाईच्या नादी आहे', असा त्याने निष्कर्ष काढला. तो समस्या सांगतो; पण त्याला उपाय सांगता येत नाही. जगातील यच्चयावत न्युक्लीअर शक्ती एकवटली, तरी त्या शक्तीने ही समस्या सोडवता यायची नाही. आमची वैदिक संस्कृती ही समस्या सोडवते. अमेरिकेने भारतीय संस्कृतीचे वळण गिरवले, तर ही समस्याच उरणार नाही.'
आजचा पुरुष भ्याड आहेच; पण स्त्रीदेखील. तिच्यात साहस नाही. पूर्वीच्या स्त्रीतील धैर्याचा अंशही नाही. वेणाबाई १६ वर्षांची तरुणी ! रामदास भिक्षेला येतात, तेव्हा भिक्षा घालतांना ती विचारते, ``तुम्हाला जो परमात्मा प्राप्त झाला, तो मला कसा मिळेल ? मिळेल का ?'' रामदास गंभीरपणे म्हणतात, ``सोड सगळे आणि चल माझ्याबरोबर.'' वेणाबाई तशीच तरण्याबांड फकिराबरोबर निघून जाते. घरात जाऊन सासूबाईंनाही विचारीत नाही की, मी जाऊ का किंवा `मी जाते', असेही सांगत नाही. तशीच निघून जाते. आजची स्त्री मनाने खचली आहे. भंगली आहे. वरवर ती स्वस्थ दिसते; पण आतून पोखरली आहे. स्त्री-दास्य, स्त्री-मुक्ती अशा सततच्या प्रचाराने, वातावरणाने ती विलक्षण खचली आहे, तृप्ती गमावून बसली आहे. तिचा तिच्यावरचाच विश्वास उडून गेला आहे. आत्मविश्वास नष्ट झाला आहे. पाश्चात्त्य स्त्रीची तिला भुरळ पडली आहे. तिला अमेरिकन स्त्री-जीवनाची विलक्षण तहान लागली आहे. विवेकानंदांची शिष्या अमेरिकन युवती निवेदिता, अरविंदांच्या फ्रेंच शिष्या माताजी, रामतिर्थांची सूर्यानंदा ही अमेरिकन शिष्या, अशा समर्पित स्त्रियांनी गुरुदेवांचे धर्मकार्य विश्वाच्या टोकाटोकाला पोहोचवले आहे. - गुरुदेव डॉ. काटेस्वामी
No comments:
Post a Comment