Advertisement

Sunday, June 28, 2009

स्त्री : कालची अन् आजची !


महालक्ष्मीकडून तेजस्विता, महासरस्वतीकडून ज्ञानसंपदा व महाकालीकडून वीरश्री घ्या !

पूर्वीच्या काळी धर्माचरणी स्त्रिया यांमुळे संस्कृती व समाज यांचे रक्षण झाले. आता स्त्री शिकून अर्थाजन करू लागली, तरी धर्माचरण व संस्कार यांच्या अभावी तिचे पर्यायाने कुटुंब व समाज यांचे अध:पतन होत आहे. प.पू. परशराम पांडे महाराज यांचा याविषयीचा मार्गदर्शनपर लेख येथे देत आहोत.

१. स्त्रीचे धर्मातील स्थान
१ अ. अर्धांगिनी, सहचारिणी, धर्मपत्‍नी, लक्ष्मी अशा विविध नावांमुळे स्त्रीचे कुटुंबातील स्थान लक्षात येणे : `भगवंताने सृष्टीची रचना करतांना पुरुष-प्रकृतीचीही रचना केली. त्यानुसार सृष्टीरचना नियमित चालू रहावी; म्हणून स्त्रीची योजना केली आहे. `वैदिक धर्मातसुद्धा धर्मकार्यासाठी विवाह करावा', असे सांगितले आहे. १६ संस्कारांपैकी `विवाह' हा महत्त्वाचा संस्कार आहे. विवाह संस्कारामुळेच पुरुष-स्त्रीमधील संबंध हा आत्मियता आणि एकरूपता यांचा होतो. त्यामुळे तिला अर्धांगिनी, सहचारिणी, धर्मपत्‍नी, लक्ष्मी अशी नावे मिळाली आहेत. या नावांमुळे तिचे कुटुंबातील स्थान लक्षात येते.
१ आ. प्रत्येक कार्यात आपल्या विविध रूपांचे दर्शन घडवणारी स्त्री ! : धर्माने तिच्याकडे केवळ भोग्य वस्तू म्हणून पाहिलेले नाही. ती प्रत्येक कार्यात सहभागी होणारी सखी आहे. धर्मकार्यात धर्मपत्‍नी आहे. प्रजोत्पत्तीसाठी ती भार्या आहे. ती पतिव्रता आहे. `पती हाच परमेश्‍वर' समजून ती त्याची सेवा करते. हीच तिची साधना असते. यामुळेच तिच्यात अमोघ पातिव्रत्य तेज निर्माण होते. जेव्हा ती सणासुदीला सुवर्णालंकारी विभूषित होते, त्या वेळी ती लक्ष्मीस्वरूप असते. '


२. मातृत्वाचा महिमा
२ अ. आईला `मातृदेवोभव' म्हणण्याचे कारण :
भगवंताने स्त्रीमध्ये मूलत:च प्रेम, दया, सद्‌भाव, करुणा, वात्सल्य, सेवा, ममता, आकर्षकता हे गुण दिले आहेत. त्यामुळे प्रयत्‍न केल्यास तिला भगवद्त्प्राप्‍ती लवकर होऊ शकते. तिच्या या वृत्तीमुळेच ती मुलाला लहानाचे मोठे करू शकते. त्यामुळेच तिला `मातृदेवोभव' म्हटले आहे. आई म्हणून तिचा महिमा सर्वांनी गायला आहे.
२ आ. मातृप्रेमाची आवश्यकता : ती मुलाची प्रथम गुरु आहे. भाषेचे ज्ञान तिच्याद्वारेच होते; म्हणून भाषेला `मातृभाषा' असे म्हणतात. आपली भारतभूमी ही आपल्याला मातेसमान आहे; म्हणून तिला आपण `मातृभूमी' म्हणतो. जिजाईसारख्या अनेक मातांनी आपल्या मुलांना घडवून शिवाजी निर्माण केले आहेत. मातेच्या चांगल्या-वाईट संस्कारांचा परिणाम तिच्या बाळावर होतो. त्याचा परिणाम समाज अन् राष्ट्र यांवर होतो. म्हणूनच घरोघरी सुसंस्कार होणे आवश्यक आहेत. ते घरातील मातेद्वारेच होत असतात. `मातृप्रेमामुळे मुले धष्टपुष्ट अन् आनंदी असतात, तर मातृसुखाविना मुले भिकारीही असतात', असे म्हटले आहे.
२ इ. संस्कारांची सुरुवात कोठून होते ? : संत तुकाराम महाराज म्हणतात, `शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ।' याचा अर्थ संस्कार हे पुरुष बिजापासून सुरू होतात पुरुषावर जर चांगले संस्कार असतील आणि त्याने चांगली साधना केली असेल, तर त्याचे वीर्यबीज हे सशक्‍त अन् शुद्ध होते. ते ज्या स्त्रीमध्ये धारण होते, तिच्यावरही चांगले संस्कार झाल्यास तिचे बीजांड सशक्‍त संस्कारित रहाते. अशा मीलनातून जी प्रजोत्पत्ती होते, तीसुद्धा संस्कारित आणि सशक्‍त असते. बालक स्त्रीच्या गर्भाशयात असतांनाही आईच्या संस्कारांचा परिणाम त्यावर होतो. पुढेही आईचे संस्कार बालकावर होत असतात. यात आईचा वाटा फार महत्त्वाचा आहे.

३. सात्त्विक, समृद्ध व सुरक्षित समाज
३ अ. एकत्र कुटुंबव्यवस्था :
पूर्वी एकत्र व मोठी कुटुंबव्यवस्था होती. घरची सर्व कामे स्त्रियांना करावी लागत, उदा. सडा, सारवण, विहिरीतून पाणी काढणे, धुणी-भांडी करणे, स्वयंपाक इत्यादी. अशा प्रकारे गृहव्यवस्थापन स्त्रियांकडेच असे. त्यामुळे त्यांची प्रकृती धडधाकट होती. त्यांचे जीवन हे त्यागमय होते. त्यांचा पोषाख साधा आणि सात्त्विक असे. त्यांच्या पातिव्रत्यामुळे त्यांच्याकडे वाईट नजरेने कोणी पहाण्याची हिंमतही करत नसे. मोठ्या कुटुंबात रहात असल्यामुळे प्रत्येक व्यक्‍तीस प्रत्येकाशी मिळून मिसळून रहाण्याची आणि सहकार्याने करण्याची सवय लागत असे. वंशपरंपरेने चालत आलेला आजीचा बटवा आयुर्वेद आणि जडीबुटीचे ज्ञान यांनी समृद्ध होता.
३ आ. धार्मिक वातावरण : व्रते-वैकल्ये करत असल्यामुळे त्यांच्यात सात्त्विकतेमुळे आत्मिक तेज विलसत होते. सणवार, चातुर्मासात पोथीवाचन, तसेच इतर वेळीसुद्धा धार्मिक विचार, ग्रंथांचे वाचन होत असल्यामुळे त्यांच्या मनावर चांगले संस्कार होत असत. त्यांचे प्रतिदिनचे आचारविचार हेसुद्धा धार्मिकतेचे असल्यामुळे देवाचे अधिष्ठान घरी असे.
३ इ. स्त्रीचे समाजातील आदराचे स्थान : खेड्यातील लोक हे धार्मिक आचार-विचारांमुळे एकमेकांशी मिळूनमिसळून प्रेमाने रहात. त्यांच्यात सहकार्याची वृत्ती होती. लिहिण्या-वाचण्यापुरते ज्ञान बहुतेक सर्वांना असे. खर्‍या दृष्टीने समाज त्या वेळी सुशिक्षित अन् समंजस होता. स्त्रियांना आदराचे स्थान होते.
३ ई. चारित्र्यवान स्त्रिया : पूर्वीच्या स्त्रिया या आपल्या शीलाला फार जपत. म्हणूनच मुसलमानांच्या आक्रमणाच्या वेळी राजस्थानी स्त्रियांनी स्वत: अग्नीसमर्पण (अग्नीदहन, जोहार) केले.

४. पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण
४ अ. इंग्रजांच्या वेळची स्थिती :
इंग्रजी शिक्षण आणि पाश्चात्त्य चालीरीती यांमुळे हळूहळू धार्मिक शिक्षण अन् आचार-विचार यांचे घराघरांतून महत्त्व अल्प (कमी) होऊ लागले. स्त्रियांनाही शिक्षण मिळण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे शहरातील स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या. त्याही नोकरी करू लागल्या. साहजिकच त्यांच्यावर पाश्चात्त्य संस्कृती अन् आचार-विचार यांचा परिणाम होऊ लागला. घरातही स्त्रियांमुळेच पाश्चात्त्य संस्कृती येऊ लागली.

५. स्त्रियांचे अध:पतन
५ अ. स्वातंत्र्यानंतरची स्थिती :
स्त्रिया घराघरातून नोकरी करावयास बाहेर पडल्या. शहरीकरणाचा परिणाम सर्वत्र झाला. खेड्यातून शहराकडे लोंढे येऊ लागले. सर्वत्र पाश्चात्त्य संस्कृती आणि शिक्षण यांचा परिणाम वाढून कारकुनी पेशाकडे लोक वळू लागले. त्यातच ते धन्यता मानू लागले. साहजिकच त्यामुळे सर्वत्र शारीरिक आणि मानसिक दुर्बलता दिसू लागली. धार्मिक आचार-विचार उणावल्याने (कमी झाल्याने) आध्यात्मिक बळ मिळेनासे झाले. जीवनात भौतिक सुखलोलुपता वाढू लागली. बहुतेक स्त्रिया पदवीधर झाल्या; परंतु त्या मनाने खचलेल्या आणि शारीरिक दुर्बलतेमुळे घरची कामे करण्यास असमर्थ बनल्या. सुखसोयींच्या साधनांची विपुलता वाढल्यामुळे शारीरिक श्रम अल्प (कमी) झाले. पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंबपद्धती न रहाता विभक्‍त कुटुंबांची वाढ होऊ लागली. याचा परिणाम असा झाला की, त्यांना कोणाचाच आधार राहिला नाही. सर्व प्रकारची धार्मिक आणि पारंपरिक शिकवण उणावली. दुसरीकडे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण झाले. त्यामुळे त्या मनाने हतबल अन् आत्मविश्‍वासरहित झाल्या. याचा परिणाम मुलांवर होऊन तीही अपंग, दुर्बल, सुखलोलुप, आळशी, धर्मसत्संगांच्या आचार-विचारांचा गंध नसलेली, व्यसनी झाली.
५ आ. चारित्र्यहीन स्त्रिया : या सर्व प्रकारामुळे आणि सरकारचे धोरणही पाश्चात्त्य संस्कृतीला पूरक असल्यामुळे (उत्तानदर्शक पोषाख घालणे) जिकडे तिकडे व्यभिचार आणि बलात्कार वाढले आहेत. समलिंगी विवाहांना उघडउघड प्रोत्साहन मिळत आहे. शोभा डे या बाईला तर श्रीराम सेनेला शह म्हणून वेश्या आणि बारबाला असलेली सीतासेना उभारावीशी वाटली. तरुण मुली चंगळवादी अन् अश्लील बनल्या असून त्या उघडपणे देहप्रदर्शन करतात. त्यांना समाजाकडून विरोध होत नाही.

६. हे सर्व कशाचे द्योतक आहे ? : हिंदूंमध्ये धर्माभिमान, आचारविचार आणि धर्मशिक्षण उरलेले नाही. त्यांना हे शिक्षण देऊन स्वाभिमानी, आत्माभिमानी, धर्म आचारविचाराने समृद्ध करणे आवश्यक आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव घराघरातून काढून तेथे आपले धार्मिक आचार-विचार रुजवणे आवश्यक आहे. आजच्या काँग्रेसच्या शासकीय धोरणांमुळे मुसलमान अन् ख्रिस्ती उन्मत्त झाले आहेत. एवढेच नव्हे, तर हिंदु मुलींना फसवून मुसलमान त्यांच्याशी लग्न लावत आहेत, नव्हे त्यांना अरबस्तानात नेऊन विकत आहेत किंवा वेश्या व्यवसायाला लावत आहेत. `आम्ही इ.स. २०५१ पर्यंत भारतावर राज्य करू म्हणजे येथील हिंदूंना मुसलमान करू', असे म्हणण्याची त्यांची मजल गेली आहे. आजही स्त्री स्वतंत्रतेने फिरू शकत नाही.

७. महालक्ष्मीकडून तेजस्विता, महासरस्वतीकडून ज्ञानसंपदा अन् महाकालीकडून वीरश्री घ्या ! : आपले आयुष्य सुखासमाधानात घालवायचे असेल, तर आपल्याला धर्माचरण करून महालक्ष्मीकडून तेजस्विता, महासरस्वतीकडून ज्ञानसंपदा व महाकालीकडून वीरश्री घ्यावी लागेल. तेव्हाच आपण सामर्थ्याने, अभिमानाने, आनंदाने जगू शकू. आपले राष्ट्र ताठ मानेने उभे राहील. त्यामुळेच ईश्‍वरी राज्य येईल. स्त्री ही घर, समाज अन् राष्ट्र यांचे दैवत आहे. तिचे संरक्षण आणि पोषण करून तिला धर्माचरणी केल्यास पुढे होणारी प्रजा ही तशीच राहील. ही काळाची गरज आहे. स्त्री ही या सर्वांचा मूळ पाया आहे.

८. सद्यस्थितीवर परिणामकारक उपाययोजना करणारी `हिंदु जनजागृती समिती' ! :
या दृष्टीने आज सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले हे प.पू. भक्‍तराज महाराजांच्या प्रेरणेने ईश्‍वरी राज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने १९९० पासून प्रयत्‍नरत आहेत. केवळ थोड्या अवधीत त्यांनी धर्मानुसार साधना व आचार-विचार यांसाठी हिंदु जनजागृती समितीद्वारे कार्य सुरू केले असून ते भारतभर नव्हे, तर जगातही पसरत आहे. त्याचा चांगला परिणाम होऊन हिंदु जागृत होत आहेत. समितीने स्त्रियांसाठी `रणरागिणी' संस्था काढून स्त्रियांना धर्मशिक्षण देणे सुरू केले आहे. या कार्यास संत आणि ईश्‍वराचा पाठिंबा आहे. आज सर्वत्र हिंदु धर्मावर होत असलेले आघात परतवण्याचा चंग समितीने बांधला आहे. `यात यश येऊन लवकर ईश्‍वरी राज्याची स्थापना होवो', ही प.पू. डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना !'



No comments:

Post a Comment