Advertisement

Sunday, June 28, 2009

घटस्फोट !

चार महिन्यातून सासरी गेलेल्या मुली क्षुल्लक कारणावरून घरी परत येतात आणि सांगतात ``नवर्‍याचा स्वभाव आवडत नाही !'' आईने ठणकावून बजावायला पाहिजे. आपले आई-वडील नोकरी करतात नां. त्यांना वाटतं आम्ही आमची मुलगी सांभाळू. नवर्‍याने सोडून दिलेली आणि नवर्‍याच्या घरातून परत आलेली मुलगी सांभाळणं सोपं आहे ? कितीही पैसा असू देत तुमच्याजवळ. जिच्यावर खरोखरच अन्याय होतो, मला मान्य आहे, तिला मी सांभाळते आहे, स्वावलंबी बनवते आहे. पण घरातल्यांचे दायित्व आहे, त्यांनी तिला ठामपणे समजावलं पाहिजे. - अधिवक्‍त्या (सौ.) अपर्णा रामतीर्थकर


घटस्फोट स्वीकारा, असे सांगणार्‍या विदुषी

भक्‍त : `गुरुदेव, युरोपमधील विद्यापिठांमधून डॉक्टरेट झालेल्या विदुषी कमला म्हणतात, ``घटस्फोटाची अटळता आपण का उपेक्षिता ? म्हणजे का स्वीकारू नये ? आपण ती स्वीकारली पाहिजे.''
गुरुदेव : ज्या युरोप, अमेरिकेने घटस्फोट सर्रास स्वीकारला, त्यांचे समाजजीवन उद्ध्वस्त झाले नाही का ? पाश्चात्त्यांची छाया बनू नका.'
- प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामी (साप्‍ताहिक सनातन चिंतन, २२ नोव्हेंबर २००७, अंक ४१)

No comments:

Post a Comment