Advertisement

Sunday, June 28, 2009

धर्मासाठी समर्पित व्हा !

स्त्रियांनी त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या आढळणार्‍या व्यवहारचातुर्य व स्त्रीसुलभता या गुणांना संसारगाड्याच्या मर्यादित क्षेत्रापुरते जखडून न ठेवता या गुणांना आध्यात्मिक क्षेत्र पादाक्रांत करण्यासाठी मोकळे ठेवले पाहिजे. सुलभा, गार्गी, भगिनी निवेदिता अशा धर्मयोध्या स्त्रियांप्रमाणे धर्मासाठी समर्पित व्हा ! साड्या, सोफासेट, टी.व्ही, गाडी यांतच गुदमरून एक दिवस जीवनयात्रा संपवायची नाही.

समाज व धर्म यांचे काही ऋण आहे. कर्तव्य आहे. ते स्त्रीने बजावले पाहिजे. ते उपेक्षिले, तर सर्वनाश अटळ आहे. स्त्रीने धर्माकरता समर्पित झाले पाहिजे. त्यातच तिचा, राष्ट्राचा व विश्‍वाचाही उत्कर्ष आहे, कल्याण आहे आणि मुक्‍तीही ! धर्माकरता बाजी लावण्याचा आजचा प्रसंग आहे. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

No comments:

Post a Comment