कुंकू लावणे म्हणजे `मागे जाणे' का वाटते ?
कुंकू लावल्याने ब्रह्मांडातील चैतन्य कमी कालावधीत स्त्रीकडे आकृष्ट होते. तसेच वाईट शक्तींपासूनही तिचे संरक्षण होते. कुंकू लावण्याचे धर्मातील हा अनन्यसाधारण लाभ लक्षात आला व त्याची अनुभूती घेतली, तर कुंकू म्हणजे काहीतरी काकूबाईसारखे आहे, प्रतिगामी आहे, असे वाटणार नाही.
मंगळसूत्र व बांगड्या जोखड का वाटतात ?
मंगळसूत्र, बांगड्या, जोडवी यांसारख्या सौभाग्यलंकारांनी तसेच इतर दागिन्यांनी स्त्रियांचे वाईट शक्तींपासून संरक्षण होते, तसेच सात्त्विक अलंकारांमुळे तिला चैतन्य मिळत रहाते. स्त्रियांना होणार्या विविध त्रासांच्या पार्श्वभूमीवर हा लाभ लक्षात घेतला, तर मंगळसूत्र आणि बांगड्या कधीच जोखड वाटणार नाहीत ! शिवाय दागिने तिचे हक्काचे स्त्रीधन असते, हे वेगळेच.
`साडी' गैरसोयीची आहे का ?
साडीमुळेही वाईट शक्तीच्या त्रासापासून स्त्रीचे रक्षण होते, तिच्यावरील काळे आवरण दूर होण्यास मदत होते व तिला चैतन्य मिळत रहाते. झाशीची राणी आणि तिच्या स्त्री सैन्याने नऊवारी साडी नेसून लढाई केली आहे, हे आपण विसरू शकत नाही. साडी गैरसोयीची वाटणार्यांना झाशीच्या राणीचे वरील उदाहरण पुरेसे आहे.
व्रतवैकल्ये म्हणजे बुरसटलेपणा आहे का ?
सात्त्विकता वाढवणारी, चैतन्य देणारी, भक्तीभाव वाढवणारी व्रतवैकल्ये म्हणजे साधनेचा एक भाग आहेत. आपल्याला ती करणे शक्य नाही, म्हणून धर्माने काहीतरी थोतांड सांगितले आहे, असा चुकीचा दृष्टीकोन ठेवणे कितपत योग्य आहे ? सण व व्रते ही शास्रानुसार साजरी केल्याने त्या दिवशी अधिकाधिक सात्त्विकता ग्रहण करता येते व त्यांचा आध्यात्मिक लाभही होतो.
मासिक धर्म पाळणे मागासलेपणा आहे का ?
`मासिक पाळीसंबंधी आता पुष्कळ संशोधन होऊन (अ)स्पर्शता न पाळल्याचे घोर निष्कर्षही शरीरशास्त्री, मानसशास्त्री व विज्ञानशास्त्री सांगतात.' `रजस्वलेने कसे वागावे याचे नियम आयुर्वेदाने दिले आहेत व त्यांचे पालन न करण्याचे घोर परिणाम काय आहेत. रजस्वलेचा स्पर्श, घाम, वस्त्रे ही अपवित्र व विषयुक्त असतात. `इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या नोव्हेंबर १९४९ च्या अंकात प्रो. रेड्डी आणि प्रो. गुप्ता यांनी काही पाश्चात्त्य शास्त्रज्ञांची संशोधने दिली आहेत. रजस्वलेच्या घामाने झाडांचा मोहोर नष्ट होतो. या घामाच्या स्पर्शाने बेडकाच्या हृदयाचे ठोके मंद झाले व सशाच्या आतड्यांची हालचाल वेगाने सुरू झाली. (रजस्वला अस्पृश्य का ? - कोपरकर) (गुरुदेव डॉ.
काटेस्वामीजी)
स्त्रीमुक्तीच्या पाश्चात्त्य चंगळवादी दृष्टीकोनातून स्त्रियांच्या संदर्भातील धर्मविचारांकडे बघू नका ! धर्माने तिला खर्या अर्थाने `मुक्त' करण्यासाठी पतीसेवा, व्रत-वैकल्ये या माध्यमांतून साधना करण्याची आणि अलंकार, वस्त्रे या माध्यमांतून धर्माचरण करण्याची उपलब्ध करून दिलेली संधी बघितली, तर `धर्म' म्हणजेच `ईश्वर' याच्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्याशिवाय दुसरे काहीच उरत नाही !
No comments:
Post a Comment