स्त्री-पुरुष समानतेचा हा काळ असल्याचे हे आधुनिक सांगतात. स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीचे स्थान देण्याकरिता त्यांचे सगळे उपद्व्याप आहेत. हा स्त्रीचा घोर अपमान आहे. त्या स्त्रीला तुम्ही आधुनिक सहस्रश: पटीने खाली आणता. अरे, पित्यापेक्षा आईचा गौरव सहस्रपटीने अधिक आहे.
आमच्या हिंदु साध्वी स्त्रीचे महिमान काय सांगावे ? चतुर्थाश्रमी, म्हणजे संन्यासी हा सगळया जगाला वंद्य असतो, तो सर्ववंद्य आहे. गृहस्थ पितादेखील संन्याशी पुत्राला वंदन करतो; परंतु पुत्र काही पित्याला वंदन करीत नाही; कारण तो आता पित्यापेक्षा श्रेष्ठ आहे, जगद्वंद्य आहे; परंतु असा सर्ववंद्य संन्याशी पुत्रदेखील आईच्या चरणांवर मस्तक ठेवतो ! आमची शास्त्रे असा मातृमहिमा सांगतात.'
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
No comments:
Post a Comment