विकासकामांकडे दुर्लक्ष करून नेत्यांचे पुतळे उभारण्यात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणार्या जनताद्रोही मायावती !
स्वत:च्या हयातीत स्वत:च स्वत:चे मोठमोठाले पुतळे बनवणार्या इराकच्या सद्दाम यांच्यासारख्या नेत्यांच्या सूचीतील भारतीय नाव म्हणजे उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती ! यांनी स्वत:चे अन् त्यांचे नेता कांशीराम यांचे ४० मोठाले पुतळे निर्माण करण्यासाठी उत्तरप्रदेश शासनाच्या कोषातील १९४ कोटी रुपयांचा चुराडा केला ! त्यांच्या पक्षाचे चिन्ह असलेल्या हत्तीच्या ६० संगमरवरी प्रतिमा आंबेडकर स्मारकापाशी उभारण्यासाठी ५२ कोटी रुपये पक्षनिधीतून नव्हे, तर जननिधीतून खर्च करण्यात आले! त्यांचे नेता कांशीराम यांचे स्मारक उभारण्यासाठी ३७० कोटी रुपये उधळण्यात आले. हा सगळा खर्च `महान नेत्यां'च्या पुतळयांच्या निर्मितीसाठी', अशी तरतूद उत्तरप्रदेशच्या २००९-१०च्या अर्थसंकल्पात करून करण्यात आला ! या एकूण ६१६ कोटी रुपये रकमेचा विचार केला, तर त्यातून ५ लाख रुपयांची १२ सहस्र ३२० घरे उभारता आली असती ! निरक्षरतेत व अनारोग्यात पुढे असलेल्या उत्तरप्रदेशात शाळा व रुग्णालये उभारता आली असती. त्यातून चौफेर विकास करता आला असता; पण मायावतींच्या दृष्टीने ही स्मारके म्हणजे सामाजिक सबलीकरणाची प्रतिके आणि लाखोंचे प्रेरणास्रोतआहेत ! केवढा हा स्वत:चा उदोउदो ! ही स्मारके उभारणे म्हणजे अनेकांना रोजगार निर्माण करणे, असे मायावतींना वाटते ! माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर काय काय घडू शकते, याचे हे उत्तम उदाहरण ! विरोधकांनी याविषयी आवाज उठवल्यावर मायावती म्हणतात, हा निधी उत्तरप्रदेशच्या विधानसभेने अर्थात जनतेने मंजूर केला आहे. आता ही उत्तरप्रदेशची विधानसभा म्हणजे दोन तृतीयांश बसपवाले ! मायावती सांगतील, तेच यांचे मत ! `मोहनदास गांधींचे राजधानीतील स्मारक अर्थात राजघाटासाठी जेवढा पैसा काँग्रेसवाल्यांनी उधळला, त्यापेक्षा हा कमीच आहे', असेही मायावतींचे उद्गार ! म्हणजे तुम्ही पैसा उधळा, आम्हीही उधळतो, ही मायावतींची मानसिकता ! उंदरांच्या होणार्या सुळसुळाटामुळे उत्तरप्रदेश हे उंदरांचे राज्य म्हणून समजले जाते. मायावती नावाचं मांजर या राज्याचे प्रमुख ! मग या मांजराच्या गळयात घंटा बांधणार कोण ?
No comments:
Post a Comment