वारकरीबंधूंनो, मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवू नका आणि धर्मद्रोही साहित्यावर प्रत्यक्ष बंदी येईपर्यंत पाठपुरावा करा !
वारकर्यांच्या संघटित शक्तीपुढे शासन नमले !
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
पंढरपूर, १ जुलै (वार्ता.) - संतांना जातीच्या राजकारणात अडकवणारे धर्मद्रोही साहित्य आणि वक्तव्ये यांवर बंदी घालण्याची मागणी वारकर्यांनी केली होती. ही मागणी मान्य न झाल्यास पालख्या वाखरीतच थांबवण्याचा इशारा वारकर्यांनी दिला होता. वारकर्यांच्या या निर्धारासमोर मुख्यमंत्री अखेर आज नमले.
वारकर्यांच्या मागण्यांविषयी योग्य ती शहानिशा करून संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश त्यांनी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक अन् सचिव यांना दिला. याविषयीचे पत्र आज देवाच्या आळंदीचे दिंडीमालक ह.भ.प. बाळासाहेब महाराज आरफळकर, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्री यांच्यासह समस्त वारकरी व फडकरी यांना प्राप्त झाले. आक्षेपार्ह साहित्य दहा दिवसांत शासनाकडे जमा करावे, असे माहिती संचालनालयाने वारकर्यांना सांगितले. शासनाकडे केलेल्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात वारकर्यांनी एका स्वतंत्र समितीची स्थापना करण्याचे निश्चित केले आहे. त्याचप्रमाणे देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे विविध मार्गांनी होणारे विडंबन रोखण्यासाठी शासनाने कायदा करावा, याकरता आणखी एक कायदेविषयक समिती स्थापन करण्याचे विचाराधीन आहे. या समितीच्या माध्यमातून विडंबनविरोधी कायदा करण्यासंदर्भात आवश्यक ती कागदपत्रे व साहित्य जमा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनुसार ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरीमध्ये न थांबता नेहमीप्रमाणे पंढरपूरच्या दिशेने प्रयाण करील, असे ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या समाजारतीनंतर जाहीर करण्यात आले.
वारकर्यांच्या मागण्या
१. मा.म. देशमुख, श्रीमंत कोकाटे, पुरुषोत्तम खेडेकर यांच्या धर्मद्रोही साहित्यावर बंदी घालावी.
२. धर्मद्रोही लेखक करत असलेले धर्मद्रोही लिखाण अयोग्य आहे, असे न वाटणार्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या विश्वस्तांना काढून टाकावे.
३. वारकरी संप्रदाय, देवता, संत, संतसाहित्य व धार्मिक विधी यांचे विडंबन आणि विटंबना करणार्यांविरुद्ध कारवाई होण्यासाठी कायदा करावा.
No comments:
Post a Comment