रॉयटर या परदेशी वृत्तसंस्थेला गुजरातचे मुख्यमंत्री आणि 
  भाजपचे प्रचारप्रमुख श्री. नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीत मी 
हिंदु राष्ट्रवादी असे म्हटल्यानंतर सगळे राजकीय पक्ष गोंधळून गेले. 
धर्मनिरपेक्षता आधारभूत धरून नेते प्रतिक्रिया देऊ लागले. काँग्रेसचे 
प्रवक्ते म्हणाले, मोदी यांचे खरे स्वरूप उघड झाले. म्हणजे या 
प्रवक्त्यांच्या मते हिंदूने स्वतःला हिंदु म्हणायचे नाही. बिहारच्या जनता 
दल (संयुक्त)च्या शासनाचे प्रवक्ते म्हणाले, मोदी सांप्रदायिक वृत्तीचे 
असल्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार त्यांना जवळ करत नव्हते. 
भाजपच्या साहाय्याने नितीशकुमार यांनी बिहारमध्ये सात-आठ वर्षे शासन स्थापन
 केले, हा भाग ते विसरले. एवढेच नव्हे, तर भाजपने श्री. मोदी यांची 
प्रचारप्रमुखपदी नियुक्ती केल्यावर नितीशकुमार यांनी भाजपशी असलेली युती 
तोडली आणि काँग्रेसच्या साहाय्याने नवे शासन स्थापन केले. सध्या श्री. मोदी
 यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ नाही; कारण बिहार 
राज्यातील एका शाळेत माध्यान्ह आहारातून झालेल्या विषबाधेमुळे २२ निरपराध 
मुलांवर मृत्यू ओढवला, त्या प्रकरणाच्या टीकेला सामोरे जाण्याची वेळ 
त्यांच्यावर आली आहे. श्री. मोदी यांनी स्वतःला हिंदु राष्ट्रवादी म्हटले; 
त्यातील हिंदु हा शब्द विरोधकांना आणि निधर्म्यांना दिसला. मोदींचा 
राष्ट्रवाद कोणाला दिसला नाही. त्या शब्दाकडे या मंडळीचा दुर्लक्ष का ? 
राष्ट्रवादाची धमक त्यांच्यात नाही का ? कि त्याचा अर्थच त्यांना कळला नाही
 ? देशाला वैभवाच्या शिखरावर पोहोचवू शकणार्या शेकडो गोष्टी श्री. मोदी 
विशद करतात. 
शेजारी देशांकडून आपल्या देशाच्या 
होणार्या अपमानाविषयी ते दुःख व्यक्त करतात. उत्तराखंडात महाप्रलय आल्यावर
 योग्य अशी दूरदृष्टी वापरून श्री. मोदी स्वतः तेथे गेले आणि तीर्थयात्रेवर
 गेलेल्या शेकडो गुजराती लोकांना सुखरूप घेऊन आले. हेलिकॉप्टरमध्ये बसून 
हवेतून केलेली ती पाहणी नव्हती. राजाने जनतेप्रती दाखवलेली ती आत्मियता 
होती. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणे आणि देशातील जनतेचे कल्याण साधणे, या 
दोन महत्त्वाच्या गोष्टी करणारा नेता लोकप्रिय ठरतो. केंद्रशासनातील एकाही 
नेत्याकडे हे गुण असल्याचे जनतेला वाटत नाही. श्री. मोदी त्यांच्यातील या 
गुणांचे प्रदर्शन आजपासूनच करायला लागले आहेत. त्यामुळे राजकीय स्तरावरील 
त्यांचा विरोध बळावत गेला, तरी तो निष्प्रभ ठरणारा आहे. 
 धर्मशिक्षणाचे महत्त्व ! 
      श्री. मोदी यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना काँग्रेसचे 
नेते दिग्विजय सिंह यांनी गर्जना केली, मी हिंदु असून माझ्या घरात ९ मंदिरे
 आहेत. श्री. मोदी यांनी स्वतः हिंदु असल्याचे सांगतांना घरातील देवांचे 
वर्णन केले नव्हते. दिग्विजय सिंह मात्र घरातील मंदिरांची संख्या घोषित 
करून श्री. मोदी यांच्यावर आघाडी घेण्याचा प्रयत्न करतात. घरात जेवढी 
मंदिरे अधिक तेवढी त्या व्यक्तीच्या हिंदुत्वाची प्रखरता अधिक, अशी काहीशी 
त्यांची समजूत झालेली दिसते. त्यामुळेच ते अशा पद्धतीने स्वतःचे वर्चस्व 
गाजवू पहात आहेत. धर्मशिक्षणाच्या अभावी दिग्विजय सिंह यांचा येथे वैचारिक 
गोंधळ उडाला आहे. त्यांचे लक्ष केवळ मताधिक्याकडे असल्यामुळे मंदिरांची 
वाढती संख्या त्यांना अभिमानाची गोष्ट वाटते. स्वतःचे हिंदुत्व सिद्ध 
करण्यासाठी ते अनेक पुरावे दाखवत आहेत. एकादशीला उपवास करणे, 
द्वारकापिठाच्या शंकराचार्यांकडून दीक्षा घेणे, अर्धा घंटा पूजा करणे, 
इत्यादी... इत्यादी. एवढे सगळे असतांना धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घेऊन आणि 
त्याच्या संपूर्ण आहारी जाऊन हिंदूंचा दुस्वास केला त्याचे काय ? हिंदूंचा 
भगवा आतंकवाद म्हणतांना जीभ कशी काय अडखळली नाही ? दिग्विजय सिंह 
यांच्याप्रमाणे कित्येक काँग्रेसी असतील की, जे त्यांच्या घरात हिंदु 
वातावरण असते, असे सांगायला पुढे येणारे असतील. श्री. मोदी यांना हिंदूंची 
संख्या मोजायची नाही, त्यांना कर्महिंदू जवळचे वाटतात. धर्मपालन करणारे 
त्यांना जवळचे वाटतात. घरात अनेक देवता असणे म्हणजे आशीर्वादांचा वर्षाव, 
असे समीकरण होत नाही. उलट अनेक देवतांची अनेक स्पंदने एकत्र आल्यामुळे 
वेगळ्याच प्रकारची स्पंदने सिद्ध होतात आणि घरातील लोकांना ती त्रासदायक 
ठरतात. घरात सततचे आजारपण, कोणालाच मनःस्वास्थ्य नसणे, मानसिक आजार, 
बोलण्यात सुसूत्रता नसणे, असे त्रास उद्भवतात. हे सर्व जाणून घेण्यासाठी 
हिंदूंना धर्मशिक्षण दिले गेले पाहिजे. असो. मोदींचा प्रचाराचा ऐरावत चालतच
 आहे. त्यांचे विरोधक बचावात्मक प्रतिक्रिया देत आहेत, काही जण स्वतः 
मोदींपेक्षा वरचढ असल्याचे भासवत आहेत, काही जण गोंधळलेल्या स्थितीत आहेत, 
तर काही जणांची बोलती बंद पडली आहे. देशभरातील वातावरण पहाता लक्षात येणारी
 गोष्ट म्हणजे देशपातळीवरील एका नेत्याचा उदय होत असतांना अनेक नेत्यांचा 
अस्त होत आहे. 

 
 
No comments:
Post a Comment