Advertisement

Saturday, May 20, 2023

‘द कश्‍मीर फाइल्‍स’पासून ‘द केरल स्‍टोरी’पर्यंत निधर्मीवाद्यांनी गोंधळ आणि आटापिटा करण्‍यामागील कारणमीमांसा !

१. ‘हिंदु मुली स्‍वतःहून मुसलमान मुलाशी प्रेम करतात’, असे प्रेमकथांमधून सिद्ध करण्‍याचा प्रयत्न !

‘सध्‍या अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याचे गोडवे गाणार्‍यांना उधाण आले असून ते भयंकर चिंतेत आहेत. त्‍यांची समस्‍या वेगळी आहे. ती समस्‍या इतकी निष्‍पाप आहे की, तिची निरागसता बाहेर दिसून येते. तिचे वास्‍तव सामान्‍य लोकांना समजत आहे, हे पुष्‍कळ मनोरंजक आहे. किंबहुना आतापर्यंत प्रत्‍येक कुकर्म हे अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याच्‍या आडून सांगणारे लोक त्‍याच्‍या मर्यादा ठरवायला लागले आहेत. सध्‍या त्‍यांची निरागसता त्‍या सत्‍यतेविषयी आहे, जी त्‍यांनी त्‍यांच्‍या धोरणांमुळे बाहेर येऊ दिली नाही. आतापर्यंत या लोकांनी हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांच्‍या प्रेमकथांमधून हिंदु कुटुंबाची मानहानी करण्‍याचे षड्‌यंत्र रचले. एवढेच नाही, तर त्‍यांनी ‘हिंदु मुली या स्‍वतःहूनच मुसलमान मुलाशी प्रेम करतात’, असे त्‍यांच्‍या कथा, कविता इत्‍यादींमधून सिद्ध करण्‍याचा प्रयत्न केला आहे.

२. ‘भारतात मुसलमान शोषित आणि हिंदु त्‍यांचे शोषण करणारे’, असा भ्रम पसरवण्‍यात निधर्मीवादी यशस्‍वी !
‘भारतात मुसलमान घाबरले आहेत’, हे आंतरराष्‍ट्रीय चर्चांमधून समोर येते, तेव्‍हा त्‍यात चित्रपटांचे योगदान मोठे असते. यातून वारंवार एक खोटी बाजू समोर आणली जाते. ती म्‍हणजे हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांच्‍या प्रेम प्रकरणात केवळ मुलीचे कुटुंबीयच दोषी असतात. ‘पीके’ या हिंदी चित्रपटामध्‍ये हिंदु मुलगी आणि पाकिस्‍तानी मुसलमान मुलगा यांच्‍या प्रेमाची गोष्‍ट दाखवण्‍यात आली होती. त्‍यात हिंदु कुटुंब कट्टर आणि प्रेमाचे शत्रू असल्‍याचे दाखवण्‍यात आले. अशाच प्रकारे ‘केदारनाथ’ हा आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्‍यातही हिंदु मुलीच्‍या आई-वडिलांना कट्टर विरोधक दाखवण्‍यात आले होते. नुकत्‍याच आलेल्‍या ‘अंतरंगी रे’ या चित्रपटामध्‍ये अक्षयकुमार अभिनय करत असलेल्‍या पात्राची त्‍याच्‍या हिंदु पत्नीच्‍या घरचेच हत्‍या करतात, असे दाखवले आहे. जेव्‍हापासून भारतातील लोकांनी चित्रपट बघण्‍यास प्रारंभ केला आहे, तेव्‍हापासून ते हाच दृष्‍टीकोन बघत आले आहेत, ज्‍यात शोषण करणारे हिंदु आणि मुसलमान मात्र पीडित असल्‍याचे दाखवण्‍यात आले. याचा अर्थ ‘राजकीय अल्‍पसंख्‍यांक’ ही संकल्‍पना चित्रपटांमध्‍ये तंतोतंत उतरली आहे. प्रत्‍यक्षात अल्‍पसंख्‍यांकांची व्‍याख्‍या अद्याप पूर्णपणे स्‍पष्‍ट झालेली नाही, हेही तेवढेच सत्‍य आहे. जर हे संख्‍यात्‍मकदृष्‍ट्या निश्‍चित केले, तर असे म्‍हटले जाईल का की, भारतावर शतकानुशतके अल्‍पसंख्‍यांकांचे राज्‍य होते ? आणि तसे असेल, तर मग हे लोक पीडित कसे ? देशात भ्रमाचे जाळे इतके घट्ट विणले गेले आहे की, त्‍यात स्‍वातंत्र्यापूर्वी आणि नंतर हिंदूंचे शोषण अन् उदारमतवादी मुसलमानांचा आवाज यांची प्रत्‍येक वेदना दडपली गेली अन् ती पुढेही येऊ शकली नाही.

३. स्‍वत:वर वेळ आल्‍यावर निधर्मीवाद्यांकडून अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्यावर अंकुश ठेवण्‍याची भाषा !
अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याचे गोडवे गाणार्‍यांनी चित्रपटांच्‍या ‘सॉफ्‍ट पॉवर’चा (सौम्‍य शक्‍तीचा) पुरेपूर वापर केला. गेल्‍या अनेक वर्षांपासून त्‍यांची कुचंबणा होत आहे. त्‍यामुळे ‘या अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्यावर काहीतरी अंकुश असला पाहिजे’, असे सूत्र ते मांडत आहेत. आता ते अंकुश ठेवण्‍याची गोष्‍ट का करत आहेत ?; कारण त्‍यांनी संपूर्ण कथानकामध्‍ये (‘नॅरेटिव्‍ह’मध्‍ये) काश्‍मिरी हिंदूंची अनेक हत्‍याकांडे आणि जीव वाचवण्‍यासाठी त्‍यांनी केलेले विस्‍थापन वर्षानुवर्षे समोर येऊच दिले नाही.

चित्रपट आणि साहित्‍य यांच्‍या माध्‍यमातून त्‍यांनाच (हिंदूंनाच) दोषी बनवून समोर ठेवण्‍यात आले. प्रत्‍यक्षात ते सर्वांत मोठे पीडित होते. आता चर्चेच्‍या पातळीवर सातत्‍याने नाकारण्‍यात येणार्‍या विषयांवर चित्रपट सिद्ध होत आहेत, तर अभिव्‍यक्‍तीच्‍या नावाने त्‍यावर परत अंकुश लावण्‍याची गोष्‍ट केली जात आहे. हे प्रकरण हिंदु महिलांचे बलपूर्वक धर्मांतर होत असल्‍याचे आणि त्‍यांना प्‍यादी बनवून ‘इसिस’मध्‍ये सहभागी करून घेण्‍याचे आहे. आकडे पुष्‍कळ काही सांगतात आणि अजेंडा (कार्यसूची) काही दुसराच ! ‘द केरल स्‍टोरी’ या चित्रपटात ते सत्‍य दाखवण्‍यात येत आहे. जे आजवर सर्वांनाच ठाऊक होते; पण ते समोर आणू शकले नाहीत. याचे कारण या विषयावर लिहिणे किंवा त्‍यावर चित्रपट बनवणे, म्‍हणजे त्‍यांचे वैचारिक ‘लिंचिंग’ (हत्‍या) होणार, हे ठरलेले होते आणि ही सामान्‍य गोष्‍ट होती. असे लिखाण केल्‍यावर अनेक प्रकारचे शिक्‍के (लेबल) बसवले जातात, संबंधित व्‍यक्‍तीला विविध प्रकारे त्रास दिला जातो आणि त्‍याला समाजात ‘विष पसरवणारा’ असे म्‍हटले जाते.

४. जगभर ‘ग्रूमिंग गँग’ची चर्चा होत असतांना ‘द केरल स्‍टोरी’ चित्रपटाचे प्रदर्शन !
हिंदु मुलींना नाव पालटून इतर अनेक पद्धतींनी प्रेमाच्‍या जाळ्‍यात अडकवले जाते. त्‍यानंतर त्‍यांचा अन्‍य प्रयोगासाठी वापर केला जातो. हे प्रयोग केवळ भारतातच होत आहेत, असे नाही, तर विदेशातही होत आहेत. नुकतीच ब्रिटनमध्‍ये ‘ग्रूमिंग गँग’ (अल्‍पवयीन मुलींना फसवून किंवा त्‍यांना प्रेमपाशात ओढून त्‍यांच्‍यावर अत्‍याचार करणारी टोळी) कार्यरत असल्‍याची चर्चा झाली. त्‍यात पाकिस्‍तानी नागरिक तेथील मुलींना कसे अडकवतात आणि सरकार कशी पावले उचलणार आहे ? यावर प्रकाश टाकण्‍यात आला. त्‍यात पाकिस्‍तानचे नावही पुढे आले होते. धर्मांध तरुणांंकडून होणारे बलपूर्वक ‘ग्रूमिंग’ आणि कट्टरतेवर आधारित ‘ग्रूमिंग’ यांची जगभर चर्चा होत आहे. त्‍याच काळात या समस्‍येवर ‘द केरल स्‍टोरी’ हा चित्रपट बनवण्‍यात आला.

या चित्रपटामध्‍ये केरळमध्‍ये कसे धर्मावर आधारित प्रेमाच्‍या जाळ्‍यात हिंदु आणि ख्रिस्‍ती मुलींना फसवण्‍यात येत आहे, हे दाखवण्‍यात आले आहे. जेव्‍हा या चित्रपटाचा ‘टीझर’ (चित्रपटाचा संक्षिप्‍त भाग) प्रदर्शित झाला, तेव्‍हापासून अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याचा पुरस्‍कार करणारी ‘लॉबी’ (वैचारिक गट) या चित्रपटाच्‍या विरोधात समोर आली होती आणि हा चित्रपट थांबवण्‍यासाठी कायदेशीर पावले उचलणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले होते; पण प्रत्‍यक्षात ही लॉबी सत्‍याला इतकी का घाबरते ? त्‍यांना असे वाटते का की, ‘ज्‍या प्रकारे ‘द कश्‍मीर फाइल्‍स’ या चित्रपटाने काश्‍मीर प्रकरणात त्‍यांना उघडे पाडले, तसेच काहीसे याही वेळी होईल ? ‘द केरल स्‍टोरी’ हा चित्रपट केरळसह संपूर्ण देशात हिंदु आणि ख्रिस्‍ती मुलींच्‍या विरोधात चालू असलेले षड्‍यंत्र लोकांसमोर उघडे करील ? कथित प्रेमाचा संदर्भ देऊन ज्‍यांना गायब केले जाते, त्‍या मुलींविषयी ही ‘लॉबी’ का बोलू इच्‍छित नाही ?’, हा एक मोठा प्रश्‍न आहे.

५. ‘द केरल स्‍टोरी’ चित्रपटामुळे छुपे धोरण उघड होत असल्‍यानेे त्‍यावर बंदी घालण्‍याचे धर्मनिरपेक्षतावाद्यांचे प्रयत्न !
‘सुदीप्‍तो सेन या चित्रपटाचे दिग्‍दर्शक आहेत. त्‍यांनी वर्ष २०१८ मध्‍ये केरळमधील ‘लव्‍ह जिहाद’वर एक माहितीपट (डॉक्‍युमेंट्री) बनवला होता. त्‍याचे नाव ‘प्रेमाच्‍या नावावर’ असे होते. हा माहितीपट तेव्‍हा मोठा प्रभाव टाकू शकला नाही. त्‍यामुळे आता विपुल अमृत शहा यांच्‍या ‘बॅनर’खाली सुदीप्‍तो सेन यांनी त्‍या हरवलेल्‍या मुलींची कथा समोर आणली आहे. त्‍यामध्‍ये ‘हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांच्‍यातील पवित्र प्रेम अन् क्रूर हिंदु पालक’ या अजेंडाला छेद देण्‍यात येत आहे. आता धर्मनिरपेक्षतावादी लॉबी अजेंडा उद़्‍ध्‍वस्‍त होत असल्‍याने हताश झाली आहे. ‘खोट्याला पाय नसतात’, हे लक्षात घ्‍यायला हवे. त्‍यामुळे जसा ‘काश्‍मीर अजेंडा’चे सत्‍य दाखवणारा चित्रपट आला, तेव्‍हा त्‍यांचा ‘अजेंडा’ उद़्‍ध्‍वस्‍त झाला. आता अनेक वर्षे चालू असणार्‍या ‘एका हिंदु मुलीचे कसाई पालक आणि निरागस प्रेम’ या कथानकाचे खरे वास्‍तव समोर आणणारा ‘द केरल स्‍टोरी’ चित्रपट प्रसारित झाला आहे. त्‍यामुळे ही लॉबी पुन्‍हा कांगावा करत आहे. अशा परिस्‍थितीत एक अतिशय महत्त्वाचा प्रश्‍न उपस्‍थित होतो की, एकतर्फी अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याची आवश्‍यकता यांना का हवी असते ? जेणेकरून भारत आणि भारताचा आत्‍मा यांच्‍या विरोधात चर्चा उभी केली जाऊ शकेल.’

– सोनाली मिश्रा

(साभार : साप्‍ताहिक ‘पांचजन्‍य’, ३०.४.२०२३)

Thursday, May 18, 2023

देवाला कौल लावणे, ही अंधश्रद्धा आहे का ?

 

प्रश्न : गावातील देवाला कौल लावणे, ही अंधश्रद्धा आहे कि प्रथा ?


उत्तर : कौल लावणे, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. देवळातली सात्त्विकता, मूर्तीतील सात्त्विकता, तसेच कौल लावणारे सात्त्विक आहते का, देवळात येणारे, प्रतिदिन पूजा करणारे सात्त्विक आहेत का ? एकंदर त्या मूर्तीत सात्त्विकता किती आहे यावर सगळं अवलंबून असते. कौल लावतांना बर्‍याचदा नातेवाईक, प्रश्न विचारणारे सर्व बाजूला गर्दी करून बसलेले असतात. त्यांना जर आतमध्ये न घेता त्यांची प्रश्नांची सूची घेऊन केवळ सात्त्विक लोक जर आत गेले, तर मूर्तीची सात्त्विकता, देवळातले, गाभार्‍यातले सात्त्विक वातावरण, कौल लावणारे सात्त्विक आहेत, अशा वेळेला उत्तर अचूक येण्याची शक्यता पुष्कळ जास्त असते. सात्त्विकता जेवढ्या प्रमाणात न्यून होत जाईल, तितके उत्तर अचूक येण्याचे प्रमाणही अल्प होत जाईल. देवस्थान सात्त्विक असणे, उदा. गोव्यातील शांतादुर्गा, शेगाव येथील गजानन महाराजांचे समाधीस्थान इत्यादी आणि बाकी कौल लावणारे सात्त्विक असले की, उत्तरे अचूक येतात अन् मग बुद्धीच्या पलीकडच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला निश्चित मिळू शकतात.

(अध्यात्मातील सैद्धांतिक भागाचा कितीही अभ्यास केला, तरी मनातील शंकांचे निरसन झाले नाही तर साधना नीट होत नाही. या दृष्टीने गांवोगांवच्या जिज्ञासू आणि साधकांच्या मनात सर्वसाधारणपणे उद्भवणार्‍या अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे. याचा अभ्यास करून अधिकाधिक जिज्ञासूंनी योग्य साधनेला आरंभ करावा आणि जीवनाचे खर्‍या अर्थाने सार्थक करून घ्यावे, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !)

साभार : ‘सनातन संस्थे’चे संकेतस्थळ Sanatan.org (सनातन डॉट ऑर्ग)

कृत्रिम बुद्धीमत्ता शेवटी कृत्रिमच !


आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (एआय) म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर आणि तिचे भविष्य यांविषयी विविध स्वरूपाच्या चर्चा चालू आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये अस्तित्वात आलेल्या ‘चॅट जीपीटी’ तंत्रज्ञानाने इंटरनेट विश्‍वाला हादरा दिला. या तंत्रज्ञानाची ४ थी आवृत्ती (व्हर्जन) आली असून आणखी हादरे देण्यास ते सज्ज झाले आहे. चॅट म्हणजे मराठीत चर्चा ! येथे एका कृत्रिम बुद्धीमत्ता असलेल्या यंत्रसदृश्य रोबोट, संगणक अथवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूशी संवाद साधला जाईल. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर संबंधित रोबोट अथवा यंत्र तुम्हाला हव्या त्या प्रश्‍नांची अचूक उत्तरे काही सेकंदांमध्ये देऊ शकणार आहे. तंत्रज्ञानातील पुढच्या आवृत्त्यांमध्ये अचूकतेने अधिकाधिक प्रश्‍नांची उत्तरे न्यूनतम अल्प कालावधीत देण्याचा प्रयत्न राहील.

तंत्रज्ञानाच्या निर्मात्यांकडूनच धोक्याची सूचना

चॅट जीपीटी यातील एक वेगळे तंत्रज्ञान म्हणून ‘मायक्रोसॉफ्ट’ आस्थापनाच्या साहाय्याने पुढे आले, तरी काही वर्षांपासून आपण ते वेगवेगळ्या प्रकारे वापरत आहोत. ‘अ‍ॅमेझॉन अलेक्सा’, ‘अ‍ॅपल सीरी’, ‘गूगल असिस्टंट’ या सर्व कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करून बनवलेल्या संगणकीय प्रणाली आहेत. भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावरील ‘आस्क दिशा’ ही सुविधाही त्याचाच प्रकार आहे. चॅट जीपीटीमुळे याला एक चांगले प्रारूप प्राप्त होऊन विविध क्षेत्रांतील आस्थापनांना त्याचा लाभ झाला असला, तरी त्याच्या संभाव्य दुष्परिणामांचीच चर्चा अधिक झाल्याने एक प्रकारे त्याच्या भविष्याविषयी भय निर्माण झाले आहे. ‘टेस्ला’ या जगप्रसिद्ध आस्थापनाचे अध्यक्ष इलॉन मस्क हे तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यास उत्सुक असतात. काही मासांपूर्वी त्यांनी एका माकडाच्या मेंदूत चीप बसवून माकडही त्याद्वारे संगणक हाताळू शकतो, असे जगाला दाखवले. हीच चीप ‘मानवी मेंदूत बसवल्यास मानवाची कार्यक्षमता अनेक पटींनी वाढू शकेल’, असे त्यांचे म्हणणे आहे. याचा दुसरा अर्थ मानवाच्या नैसर्गिक क्रियांमध्ये हस्तक्षेप करून ‘प्रोग्रॅम’ला हवे तसे करू देणे, असा होतो. मस्क यांच्या या संशोधनावर टीका झाली, तरी मस्क यांनी त्याकडे लक्ष न देता संशोधन चालूच ठेवले. हेच मस्क महाशय आता चॅट जीपीटीच्या विरोधात आहेत. ‘ओपन एआय’ने चॅट जीपीटी शोधले त्याचे मस्क पूर्वी सहसंस्थापक होते. इलॉन मस्क यांनी नुकतेच ‘भविष्यात मानवी जीवनासाठी एआय धोका आहे. तरी त्याचे अनेक लाभ असले, तरी तो मोठा धोका आहे. एआयवरील संशोधनावर कुणीतरी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे’, असे सांगितले. इटलीने चॅट जीपीटीवर बंदी घातली असून युरोपातील देश बंदी घालण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत. ‘एआय’चे जनक जेफ्री हिंटन यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी सांगितले की, ‘एआय’मुळे संपूर्ण मानवी जीवनाला धोका आहे, दिवसेंदिवस हे तंत्रज्ञान अधिक भयानक होत चालले आहे आणि मानवाच्याही पुढे जाईल. स्वत:च सिद्ध केलेल्या तंत्रज्ञानाविषयी चिंता व्यक्त करत हिंटन यांनी गूगलची नोकरीही सोडली आहे. या तंत्रज्ञानाची दाहकता त्याच्या निर्माणकर्त्यांनीच सांगितली असली, तरी अन्य आस्थापने, व्यावसायिक संस्था ‘एआय’चा त्यांच्या लाभासाठी उपयोग करत आहेत.

अमेरिकेकडून दक्षता !

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या देशातील सर्व मोठ्या तंत्रज्ञान आस्थापनांच्या प्रमुखांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत अमेरिकेच्या प्रशासनाने आस्थापनांना ‘एआय ही धोक्याची घंटा ठरू नये. वापरकर्त्याची गोपनीयता हेच प्राधान्य असेल. देशविघातक गोष्टींना खतपाणी घालू नये’, असे बजावले आहे. चीन याच कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर भारताशी युद्ध करण्याची सिद्धता करत आहे. कृत्रिम बुद्धीमता असलेले ‘कृत्रिम सैनिक (रोबोट)’ भारताच्या सीमेवर तैनात केले असल्याचे वृत्त आहे. ‘एआय’चा धोका हा कर्मचारी कपात होईल, बेरोजगारी वाढेल, यादृष्टीने घेतला जात आहे. याला पुष्कळ अवकाश आहे.

विवेक जागृत हवा !

कृत्रिम बुद्धीमत्तेत मुख्य अडचण अशी आहे की, सर्वसाधारण मनुष्याला एखादा प्रश्‍न विचारला, तर तो प्रश्‍नकर्त्याच्या हेतूविषयी विश्‍लेषण करून त्याला तेच उत्तर वेगळ्या प्रकारे देऊ शकतो, उत्तर टाळू शकतो; मात्र कृत्रिम बुद्धीमत्ता असलेले यंत्र असे विश्‍लेषण कसे करू शकेल ? त्यामुळे कोणत्या हेतूने प्रश्‍न विचारला आहे, यापेक्षा उत्तर जेवढ्या जलद शक्य आहे, तेवढ्या जलद देण्याकडे यंत्राचा कल राहील. येथेच धोका असू शकतो. जगातील कोणतीही माहिती गूगल आपल्याला संबंधित लिंक्स शोधून देते. त्या लिंक्समधून आवश्यक ती माहिती शोधण्यासाठी आपल्याला वाचनासाठी वेळ द्यावा लागतो. ‘एआय’मध्ये तीच माहिती नेमकेपणाने आणि अचूक मिळते. एखाद्या व्यक्तीची संपूर्ण माहिती अगदी त्याच्या वैयक्तिक आयुष्यासह मिळवणे, काही धोकादायक वस्तू सिद्ध करण्याची माहिती उदा. बाँब बनवणे; महाविद्यालय, विद्यालय यांच्या परीक्षांच्या वेळी प्रश्‍नपत्रिकेतील उत्तरे मिळवणे, मुलाखतीच्या वेळी प्रश्‍नांची उत्तरे मिळवणे, औषधे देणे, एखाद्यावर वैयक्तिक आक्रमण करणे, देशातील गोपनीय माहिती उघड करणे इत्यादी कृतींसाठी वापर झाल्यास ‘एआय’ अधिक धोकादायक होऊ शकतो. आपल्याला ‘तुझा विवेक जागृत आहे का ? विवेकाला स्मरून बोल, वाग, असे बोलण्याची पद्धत आहे. या पार्श्‍वभूमीवर यंत्राचा विचार केल्यास त्याचा असा विवेक जागृत करता येईल का ? तात्पर्य कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी संशोधन करतांना ते मर्यादित क्षेत्रांसाठी विचार करून आणि तेही सारासार विवेकबुद्धी जागृत ठेवून करणे आवश्यक आहे; यासाठी प्रथम विवेक जागृत करणारी साधनाच करणे आवश्यक आहे.

Wednesday, May 17, 2023

… तरच धार्मिक दंगली थांबतील !


अकोला येथे दंगलसदृश परिस्थितीमुळे अद्याप तणावपूर्ण शांतता आहे. समाजमाध्यमांवरील पोस्टवरून १३ मेच्या मध्यरात्री हरिपेठ भागात या वादाला प्रारंभ झाला. या दंगलीमुळे एकाला प्राण गमवावा लागला, तर १० जण घायाळ झाले. यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे. कुणी कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असेल, तर त्यावर कारवाई व्हायलाच हवी. प्रसारित केलेली पोस्ट वादग्रस्त असेल, तर ती प्रसारित करणार्‍यांवर कारवाई व्हायला हवी; मात्र ती कारवाई कायद्यानुसार व्हावी. भावना मुसलमानांच्या असोत किंवा हिंदूंच्या कुणाला कायदा हातात घेण्याची अनुमती राज्यघटनेने दिलेली नाही. म.फि. हुसेन या मुसलमान चित्रकाराने हिंदूंच्या देवतांची अनेक नग्न चित्रे काढली. त्या वेळी ‘हुसेन मुसलमान आहे’ म्हणून हिंदूंनी सर्व मुसलमानांना दोषी धरून त्यांच्यावर आक्रमण केले नाही. हुसेन यांच्या विरोधात हिंदूंनी कायदेशीर पद्धतीने देशभरात विविध ठिकाणी १ सहस्रहून अधिक तक्रारी प्रविष्ट केल्या. हिंदूंच्या देवतांवर उपहासात्मक विनोद करणारा हास्यकलाकार मुनव्वर फारूकी असो, वा हिंदूंच्या देवतांना ‘वेश्या’ म्हणण्यापर्यंत अवमान उघडपणे करणारा झाकीर नाईक असो, ‘हे सर्व मुसलमान आहेत’ म्हणून हिंदूंनी कधीही दंगली घडवल्या नाहीत, ना त्यासाठी सर्व मुसलमान समाजाला दोषी धरले. हिंदूंनी नेहमीच कायदेशीर मार्गाने दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. मुसलमान मात्र कुणा हिंदूकडून त्यांची कथित धार्मिक भावना दुखावली गेली, तर विनाकारण सर्वसामान्य हिंदु समाजाला लक्ष्य करतात. हिंदूंच्या हत्या करतात आणि दंगली घडवतात. मुसलमानांच्या या दंगलखोरीला आवरण्यास पोलीस, प्रशासन आणि शासनकर्ते कुचकामी ठरत आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्रात वारंवार होत असलेल्या या दंगली या सर्वांच्या नाकर्तेपणाचा परिणाम होय.

अकोला येथील दंगलीचा हा काही पहिलाच प्रकार नाही. काही मासांपूर्वी अमरावती येथेही ‘धार्मिक भावना दुखावल्या’ म्हणून धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. हिंदूंच्या दुकानांची जाळपोळ केली. म्यानमार येथे मुसलमानांवर अन्याय झाला; म्हणून वर्ष २०१२ मध्ये धर्मांध मुसलमानांनी महाराष्ट्रातील आझाद मैदान येथे दंगल करून पोलिसांवरही आक्रमण केले होते. ही आहे त्यांची दंगलखोर वृत्ती ! येनकेन प्रकारेण कुठला तरी धार्मिक वाद उकरून काढायचा आणि हिंदूंना लक्ष्य करायचे, ही धर्मांध मुसलमानांची वृत्ती यातून लक्षात येते. यामध्ये मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे कुणीही समर्थन करून शकत नाही; मात्र त्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. हे कारण पुढे करून धर्मांध मुसलमानांनी दंगली घडवणे हे आक्षेपार्ह आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावर ते कायदेशीर मार्ग अवलंबतात, मग मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखवल्यास त्यांना दंगल घडवण्याचा परवाना कुणी दिला ? उगाचच ‘धार्मिक भावना’ हा शब्द वापरून मुसलमानांचा हा दंगलखोरपणा पोलिसांनी खपवून घेऊ नये.

योगींचा आदर्श घ्यावा !

योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होण्यापूर्वी उत्तरप्रदेशमध्येही धर्मांध मुसलमान अशाच प्रकारे दंगली करत होते; मात्र दंगली घडवणार्‍यांकडून सरकारने हानीभरपाई वसूल करण्याची पद्धत अवलंबली. वसुली होण्यासाठी दंगलखोरांच्या मालमत्तेचा लिलाव करून हानीभरपाई वसूल केली जाते. दंगलखोरांना अशा प्रकारे पोलिसी खाक्या दाखवला जातो की, ते पुन्हा समाजात दंगल माजवण्याचे धारिष्ट्य करत नाहीत. ‘अल्पसंख्यांक आहेत, म्हणून मुसलमानांचे फाजील लाड चालणार नाहीत’, हे योगी आदित्यनाथ यांनी दाखवून दिले. कुणाही मुसलमानावर तो ‘मुसलमान’ आहे म्हणून अन्याय होऊ नये; मात्र तो समाजकंटक असेल, तर ‘मुसलमान’ आहे म्हणून त्याला सोडूही नये. ही भूमिका स्पष्ट असेल, तर समाजकंटकांना शिक्षा करण्यामध्ये त्यांचा धर्म आड येणार नाही. दुर्दैवाने महाराष्ट्रातील पोलीस आणि प्रशासन ‘मुसलमान’ म्हटले की, कचखाऊ भूमिका घेतात. हे फाजील लाड बंद होतील, तेव्हाच या दंगली थांबतील. यासाठी योगी आदित्यनाथ यांचा आदर्श महाराष्ट्राच्या नेतृत्वाने घ्यायला हवा.

मुसलमानांच्या धार्मिक भावना आहेत, तशा त्या हिंदूंच्याही आहेत. मुसलमान मात्र त्यांच्या धार्मिक भावनांचा बागुलबुवा निर्माण करत आहेत. हिंदूंच्या उत्सवांच्या मिरवणुका मशिदीजवळून जातांना वाद्ये वाजवल्यास मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतात. काही ठिकाणी मुसलमान रस्त्यावर नमाजपठण करून सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करतात. अनेक ठिकाणी मशिदी, मदरसे यांवर भोंगे लावून ध्वनीप्रदूषण करतात. हे सर्व अवडंबर धर्माच्या नावाखाली चालू आहे. याला कुणी विरोध केला, तर मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतात. पोलीस आणि प्रशासन ‘धार्मिक भावना दुखावल्यास मुसलमान दंगल घडवतील’, या भीतीने कारवाई करण्यास कचरतात. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचाही अवमान केला जातो. हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी जर ‘डीजे’चा आवाज वाढला, तर पोलीस लगेच संबंधित गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करतात.

गळचेपी मात्र हिंदूंची !

दंगल होऊ नये, यासाठी आवश्यक ती काळजी पोलीस आणि प्रशासन यांनी घ्यायलाच हवी. असे करतांना जे दंगलखोर आहेत त्यांना वचक बसेल, अशी त्यांची कारवाई हवी; मात्र असे करण्याऐवजी पोलीस हिंदूंची गळचेपी करतात. त्यामुळे धर्मांध मुसलमानांचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, पोलीस आणि प्रशासन उद्दाम धर्मांधांसमोर नांगी टाकतात, तर निरपराध हिंदूंसमोर मर्दुमकी गाजवतात, हे चित्र आहे. ‘मुसलमान’ म्हटले की, राजकीय नेत्यांची भूमिकाही गुळमुळीत होते. मुसलमानांच्या या धर्मांधतेला भीक घालणे पोलीस, प्रशासन आणि शासनकर्ते थांबवतील, तेव्हा धार्मिक कारणामुळे होणार्‍या दंगलीही थांबतील.

Monday, May 8, 2023

भारतविरोधी धोरण चालवणार्‍या विदेशी शक्तींना अर्थमंत्री सीतारामन् यांचे सडेतोड प्रत्युत्तर !


१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी देशातील कथित निधर्मी नेत्यांना विदेशी माध्यमांचे साहाय्य

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार विदेशात खोट्या बातम्यांच्या आधारावर भारतविरोधी धोरण (अजेंडा) चालवणार्‍या शक्तींना ते जेथून हे धोरण चालवत आहेत, तेथे जाऊन सडेतोड उत्तर देत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी त्यांच्या अमेरिका दौर्‍यात भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार आणि चुकीची वागणूक यांविषयी पाश्चात्त्य माध्यमांमध्ये खोट्या गोष्टींवर बनवण्यात येणार्‍या अपप्रचाराला सडेतोड उत्तर दिले. त्यामुळे स्वाभाविकच भारतविरोधी सर्व शक्ती आणि देशातील तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी यांच्या घड्यावर पाणी पडले अन् ते पुन्हा एकदा त्यांच्या प्रदूषित विचारांचे प्रदूषण पसरवण्याच्या कामाला लागले. भारतात बसलेले कथित धर्मनिरपेक्षतावादी नेते इतके उघडपणे खोटे बोलत आहेत की, केवळ स्वार्थासाठी भारताला कमकुवत बघायचे स्वप्न पहाणार्‍या विदेशी शक्तींच्या व्यतिरिक्त त्यांच्यावर कुणीही विश्वास करणार नाही.

वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व सांभाळल्यानंतर त्यांची भारतासह जगभरात सतत लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे देशातील कथित धर्मनिरपेक्षतावादी पक्षांची झोप उडाली असून आता ते विदेशात भारतातील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांच्या खोट्या गोष्टी प्रसारित करवून मोदी सरकार आणि भाजप यांची प्रतिमा वाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांना पाश्चात्त्य माध्यमांचेही सहकार्य आहे.

२. अर्थमंत्री सीतारामन् यांचे मुसलमानांवरील कथित अत्याचारांच्या अपप्रचाराला ठोस प्रत्युत्तर

अमेरिकेमध्ये अर्थमंत्री सीतारामन् यांच्या वक्तव्यांकडे जाण्यापूर्वी काही आकडेवारी पहावी लागेल. त्यानुसार ‘जगभरातील ५० हून अधिक मुसलमान देशांची लोकसंख्या एकत्र करूनही भारताची मुसलमान लोकसंख्या दुसर्‍या स्थानावर आहे. ज्या जलदगतीने भारतात मुसलमान लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे पाकिस्तानही तिसर्‍या स्थानावर आला आहे. स्वातंत्र्यानंतर वर्ष १९५१ मध्ये भारतात मुसलमानांची लोकसंख्या ९.८ टक्के (३ कोटी ५४ लाख) होती, जी वर्ष २०११ च्या जनगणनेमध्ये वाढून १४.२३ टक्के (१७ कोटी २२ लाख) झाली. वर्ष १९५१ मध्ये हिंदूंची लोकसंख्या ८४.१० टक्के (३० कोटी ४ लाख) होती, जी वर्ष २०११ च्या जनगणनेमध्ये घटून केवळ ७९.८० टक्के (९६ कोटी ६३ लाख) राहिली आहे. मागील एका दशकात मुसलमान लोकसंख्या जलदगतीने वाढत आहे. एवढे अत्याचार होत असतील, तर कोणताही समाज एवढ्या जलदपणे त्याची लोकसंख्या कशी वाढवू शकेल ?’
अमेरिकेच्या एका कार्यक्रमामध्ये अर्थमंत्री सीतारामन् यांनी पाकिस्तान आणि काँग्रेस प्रायोजित धोरणाची हवा काढतांना स्पष्टपणे म्हटले, ‘‘भारत मुसलमान लोकसंख्येचे जगातील दुसरे सर्वांत मोठे घर आहे आणि अल्पसंख्यांक सूत्रांवर भारताला दोष देणार्‍यांना वास्तविक स्थितीची कोणतीही माहिती नाही.’’ त्यांनी म्हटले की, जे लोक असे विचार पसरवत आहेत, त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, वर्ष २०१४ ते २०२३ या कालावधीत मुसलमानांची लोकसंख्या घटली नसून वाढली आहे.

भारतात स्वातंत्र्याच्या काळापासून मुसलमानांच्या लोकसंख्येत कधीच न्यूनता आली नाही. याउलट पाकिस्तान ज्याची स्थापना वर्ष १९४७ मध्ये झाली, तेथे धर्माच्या रूपात अल्पसंख्यांकांना नष्ट करण्यात आले. सीतारामन् यांनी भारतात अल्पसंख्यांकांच्या विरोधात हिंसाचाराविषयी पाश्चात्त्य माध्यमांमध्ये प्रकाशित होणार्‍या बातम्यांवर प्रश्नचिन्ह उभे करतांना म्हटले की, जे अशा प्रकारचे माहिती अहवाल बनवतात, त्यांना सत्यता जाणून घेण्यासाठी भारतात आले पाहिजे आणि वास्तविक स्थिती पाहिली पाहिजे. केवळ ऐकीव माहितीवरून त्यांचा अहवाल सिद्ध करू नये. यासाठी मी त्यांना भारतात आमंत्रित करते. त्यांनी असेही म्हटले आहे की, जर भारतात मुसलमानांचे जीवन कठीण असते, तर त्यांची संख्या वाढली नसती. ते केवळ वाढतच नाहीत, तर भारतात व्यवसायही करत आहेत. त्यांची मुले शिकत असून त्यांना सुविधाही मिळत आहेत.

३. अर्थमंत्र्यांनी खलिस्तानी षड्यंत्राला प्रत्युत्तर दिल्याने देशद्रोही धर्मनिरपेक्ष समुदाय संतप्त

परकीय भूमीवरून चालवल्या जात असलेल्या खलिस्तानी षड्यंत्रालाही अर्थमंत्र्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर देशद्रोही धर्मनिरपेक्ष समुदाय संतप्त झाला आणि सामाजिक माध्यमांतील विषारी ‘लिखाणा’चा पूर आला. सर्वप्रथम ‘मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (ए.आय.एम्.आय.एम्.)चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी एका मागून एक २७ ‘ट्वीट’ केले आणि रा.स्व. संघ ते सोमालियापर्यंतच्या गोष्टींविषयी बोलले. त्यांनी येथपर्यंत म्हटले की, सत्ताधारी पक्षाकडे एकही मुसलमान खासदार नाही. अशा प्रकारे अनेक खोटी विधाने केली; पण आता त्यांच्या विधानाकडे कुणी लक्ष देत नाही; कारण लोकांना ओवैसींचे सत्य चांगलेच समजले आहे. वास्तविक गोष्ट अशी आहे की, ओवैसी यांना देशातील एकमेव मुसलमान नेते बनायचे आहे; परंतु सध्या ते यशस्वी होऊ शकत नाहीत आणि ते कधीही तसे होऊ शकणार नाहीत.

४. केंद्र सरकारकडून मुसलमानांवर अनेक योजनांचा वर्षाव होत असतांना कट्टरतावादी मुसलमानांचा मोदी यांना विरोध

आज धर्मनिरपेक्षतावाद्यांचा खोटारडेपणाही फोल ठरत आहे; कारण भारतात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यापासून सरकारच्या सर्व योजनांचा ३० टक्के लाभ मुसलमान समाजाला मिळत आहे. पंतप्रधान आवास योजना, जनधन योजना, विनामूल्य रेशन, उज्ज्वल गॅस योजना, मुद्रा योजना, प्रत्येक घरी शौचालय, कर्ज योजना यांसह मोदी सरकारच्या अनेक योजनांचा थेट लाभ मुसलमानांना मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये हजचा कोटा २ लाख रुपये करण्यात आला आहे. गृहनिर्माण योजनेमध्ये मुसलमान समाजाचा वाटा सातत्याने २४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. उज्ज्वला योजनेचा लाभ मुसलमान महिलांना मिळत असल्याने त्यांना आरोग्य सुरक्षा मिळत आहे. मुसलमान समाजाचा देशाच्या मुख्य प्रवाहात समावेश व्हावा, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशासित राज्यांची सरकारे मुसलमान समाजातील महिलांना सशक्त अन् सुरक्षित जीवन जगण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांना तिहेरी तलाकच्या माध्यमातून मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे मुसलमान महिलांमध्ये नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढली आहे. आज लक्षावधी मुसलमान महिलांना नरेंद्र मोदींचा अभिमान आहे. आज त्या नरेंद्र मोदी यांच्यामुळे सुरक्षित आणि तणावमुक्त जीवन जगू शकत आहेत. उत्तरप्रदेशातील योगी सरकार राज्यातील तिहेरी तलाक पीडित महिलांना आर्थिक आणि सामाजिक साहाय्यही करत आहे. मुसलमान समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी देशातील आणि राज्यातील मदरशांचे आधुनिकीकरण करण्याची मोहीम राबवत आहे; परंतु दुर्दैवाने मुसलमान कट्टरतावादी याच्या विरोधात आहेत.

५. भारतीय मुसलमानांवरील अत्याचाराच्या कथित कथा सिद्ध करणारे काश्मिरी, पाकिस्तानी आणि बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचारांविषयी गप्प !

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना पसमांदा (दलित आणि मागास मुसलमान) मुसलमानांमध्ये जाण्याचे आवाहन केले, तेव्हापासून धर्मनिरपेक्ष पक्षांच्या पोटात दुखू लागले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रमही १०० मदरशांमध्ये सांगितला गेला आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये भीती पसरली आहे की, जे भारतातील मुसलमानांवरील अत्याचाराच्या खोट्या कथा सिद्ध करतात आणि माध्यमांमध्ये प्रसारित करतात. काश्मिरी हिंदूंच्या हत्या आणि पलायन यांवर मौन बाळगणारे हे लोक पाकिस्तान अन् बांगलादेश येथील हिंदु अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अत्याचारांविषयी मात्र मौन बाळगून आहेत. हे तेच लोक आहेत, जे ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला निरर्थक आणि मूर्खपणा म्हणतात. हे लोक पाकिस्तानात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारावर एकही प्रश्न विचारत नाहीत; कारण त्यांना त्यांची मुसलमान मतपेढी चिडण्याची भीती आहे. अमेरिकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी सांगितले, ‘‘आता भारत पालटत आहे आणि प्रत्युत्तर कसे द्यायचे, हे त्याला चांगलेच ठाऊक आहे.’’
– श्री. मृत्यूंजय दीक्षित (साभार : साप्ताहिक ‘विवेक’, हिंदी; एप्रिल २०२३)