नवी दिल्ली, २७ एप्रिल (वृत्तसंस्था) - पाकसाठी हेरगिरी करणार्या पाकमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील ५३ वर्षीय माहिला अधिकारी माधुरी गुप्ता यांना अटक करण्यात आली. (गुप्ता यांच्यासारख्या राष्ट्रद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी ! - संपादक) गुप्ता यांना न्यायालयाने चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. केंद्रीय गृहसचिव जी.के. पिल्ले यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. इस्लामाबाद येथील भारतीय गुप्तचर यंत्रणा `रॉ'च्या प्रमुखांवरही संशय व्यक्त करण्यात येत असल्याचे वृत्त वृत्तसंस्थांकडून देण्यात आले आहे.
भारतीय विदेश सेवेच्या `ब' श्रेणीची अधिकारी असलेल्या गुप्ता या गेल्या दोन वर्षांपासून इस्लामाबाद येथील भारतीय दूतावासात कार्यरत होत्या. सार्क परिषदेच्या निमित्ताने त्यांना भारतात बोलावून अटक करण्यात आली. उर्दू उत्तमरीत्या जाणार्या गुप्ता दूतावासातील प्रसारमाध्यम आणि सूचना विभागात काम करत होत्या.
Wednesday, April 28, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment