Saturday, November 8, 2008

कोल्हापूर येथे धर्मांध मुसलमानाने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती फोडली !

मुसलमानांकडून होणारा राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखण्यास अपयशी ठरलेले निष्क्रीय काँग्रेस सरकार !

सनातन गेली आठ वर्षे सांगत असलेला, ख्रिस्ताब्ध २००८ पासून येणारा वाईट काळ तो हाच !

सनातनचे वरील भाकीत आता सत्यात उतरत आहे, ही भाकिते खोटी वाटणार्‍या अंनिसला सणसणीत चपराक !



महाआरतीसाठी निघालेले हिंदू

कोल्हापूर, ७ नोव्हेंबर (वार्ता.) - परगावी जाण्यास विलंब झाल्याने काल रात्री एका धर्मांध मुसलमानाने दाभोळकर कॉर्नर येथील `महेश मोटर्स'चे कार्यालय फोडले.

(राग व्यक्‍त करण्याचे सर्व सनदशीर मार्ग संपले का ? हिंदूंनो, अशा हिंसक मुसलमानांशी कोणताही आर्थिक वा अन्य व्यवहार करायचा कि नाही, हे आता ठरवा ! - संपादक) कार्यालयातील साहित्याबरोबर त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती फोडली. (मुसलमानांचा हिंदुद्वेष ! - संपादक) त्यानंतर त्या धर्मांधाने चौकात येऊन नमाजपठण केले. ही माहिती समजताच सर्व हिंदुत्ववादी जमा झाले. संतप्‍त हिंदुत्ववाद्यांनी तीव्र घोषणाबाजीनंतर रस्ता बंद केला. (या जागी एखाद्या हिंदूने मुसलमानांच्या श्रद्धास्थानाचा अवमान केला असता, तर मुसलमानांनी त्या हिंदूचे काय केले असते, हे सांगायला नको. हिंदू तसे करत नाहीत, म्हणून मुसलमान मुजोर झाले आहेत का ? - संपादक) या मुसलमानाला माथेफिरू ठरवण्याचा पोलिसांचा प्रयत्‍न हिंदुत्ववाद्यांनी हाणून पाडला. (मुसलमानाने हिंदूंच्या भावना दुखावल्या की, डॉक्टर नव्हे, पोलीसच त्याला माथेफिरू ठरवतात. उद्या एखाद्या दंगलीच्या प्रसंगी अशा माथेफिरू मुसलमानांच्या तावडीत पोलीस सापडले, तर त्यांना मदत करायची का, हे हिंदूंनी आताच ठरवून ठेवावे ! - संपादक) या मुसलमानावर कडक कारवाई करण्याची मागणी हिंदुत्ववाद्यांनी केली. सप्टेंबर महिन्यात बेंगळुरू येथील फैजुल्ला शेख कोल्हापूर शहरात आला होता. तो काल सायंकाळी ६.३० वाजता एका खाजगी बसने परत जाण्यासाठी दाभोळकर कॉर्नर येथे आला. बेंगळुरूला जाणार्‍या बसमधून जात असतांना टी.ए. बटालीयन येथे बस बंद पडली. त्यामुळे संतापलेल्या फैजुल्ला शेखने चालकास मारहाण केली. त्याला कार्यालयात आणून प्रवासभाडे परत द्यायला लावले. त्यानंतर रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास त्याने कार्यालयाची नासधूस केली. (मारहाण व नासधूस करणार्‍या या मुसलमानाला रोखण्याचा प्रयत्‍न हिंदूंनी केला असता, तर त्या
हिंदूंवर कठोर कारवाई करण्याची तत्परता मात्र पोलिसांनी नक्कीच दाखवली असती ! - संपादक) तेथील ६ इंच उंचीची छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती त्याने रस्त्यावर आपटून फोडली. (गेली साठ वर्षे अतीव लांगूलचालन करून काँग्रेसने मुसलमानांना उन्मत्त केले आहे व हिंदूंचे पराकोटीचे खच्चीकरण केले आहे. म्हणूनच भर रस्त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती फोडण्याची मग्रुरी एकटादुकटा मुसलमानही सहजपणे करू धजावत आहे. हिंदूंनो, ही लज्जास्पद स्थिती बदला व त्यासाठी येत्या निवडणुकीत काँग्रेस सरकारला हटवा ! - संपादक)

भर चौकात हिंदूंना चिथावणी देऊन नमाजपठण !
एवढे होऊनही त्या धर्मांधाचा राग कमी झाला नाही. त्याने दाभोळकर चौकात येऊन रस्ता अडवला. ``माझ्यावर कोण कारवाई करतंय, तेच बघतो!'', अशी घमेंडीची भाषा बोलत तो आव्हान देत होता. त्याने रस्त्यातच नमाजपठणास सुरुवात केली. हे सर्व होत असतांना `महेश मोटर्स'मधील सर्व जण पळून गेले. (हे वाचून ज्या हिंदूंची मान शरमेने खाली जात नाही, ते हिंदूच नव्हेत ! - संपादक) तेथे उपस्थितांपैकी काहींनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात माहिती दिली; मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. (एवढ्या भयानक प्रकाराकडे केवळ तो प्रकार एक मुसलमान करत आहे, म्हणून दुर्लक्ष करणार्‍या पोलिसांचा धिक्कार करावा तेवढा थोडाच ! अशा पोलिसांना हिंदूंनी घाम गाळून कर भरून पोसायचे कशाला ? - संपादक) त्यानंतर रहीम मध्यवर्ती बसस्थानकात जाऊन कर्नाटक परिवहन महामंडळाच्या हुबळी येथे जाणार्‍या गाडीत बसला. तेव्हा नागरिकांच्या आग्रहास्तव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

`एकदाच घुसणार, भगवा दिसणार !' - हिंदुत्ववाद्यांची संतप्‍त प्रतिक्रिया !
रात्री १० वाजेपर्यंत ही घटना वार्‍यासारखी शहरात पसरली. चौकातील दुकाने व कार्यालये बंद करण्यात आली. काही वेळातच ५०० हून अधिक हिंदुत्ववादी रस्त्यावर उतरले. (या जागी मुसलमान असते, तर ५ हजारांहून अधिक आले असते ! - संपादक) `हिंदु धर्म की जय', `वन्दे मातरम्', `एकदाच घुसणार, भगवा दिसणार !', `हिंदु धर्माचा विजय असो', अशी तीव्र घोषणाबाजी करून आणि स्फूर्तीगीते म्हणून त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

प्रचंड पोलीस बंदोबस्त !
शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांची जादा कुमक बोलावून चौकात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. (सनदशीर मार्गाने पोलिसांकडे न्याय मागणारे व समोर असलेल्या आरोपी मुसलमानाला स्पर्शही न करणारे हिंदू कायदा व सुव्यवस्था बिघडवतील म्हणून जादा कुमक मागवणार्‍या पोलिसांनी हीच तत्परता धर्मांध मुसलमान हिंदुद्वेषाचे थैमान घालत असतांना का दाखवली नाही ? हिंदूंनी काहीही केले नाही, तरी त्यांना चेपायचे व मुसलमानाने काहीही केले, तरी घडी घातलेले हात सोडायचेही नाहीत, ही पोलिसांची संतापजनक रीत आहे ! - संपादक) या वेळी अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप, शहर पोलीस उपअधीक्षक श्री. तुषार पाटील, शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते.

पोलीसांचा फैजुल्लाच्या बाजूने हिंदुत्ववाद्यांशी वाद !
फैजुल्ला कोल्हापूर येथे कधी आला, तो कोठे रहात होता, त्याला कोणी कोणी सहकार्य केले, शहरात तो काय करत होता, तो दिवसभर कोठे थांबला होता, त्याचा दहशतवाद्यांशी संबंध आहे का, अशा सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी हिंदुत्ववाद्यांनी केली. या वेळी पोलिसांनी अनेकदा हिंदुत्ववाद्यांशी वाद घातला. (हिंदूंच्या धर्मभावना दुखावणार्‍या मुसलमानाच्या बाजूने हिंदूंशी वाद घालणारे धर्मद्रोही व न्यायद्रोही पोलीस ! - संपादक) शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

फैजुल्लाला माथेफिरू ठरवण्याचा पोलिसांचा प्रयत्‍न निष्फळ !
त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी, मुस्लीम वसतीगृहाचे पदाधिकारी व पोलीस यांची संयुक्‍त बैठक झाली. फैजुल्लाला मदत करणार्‍या कादर मलबारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्ववाद्यांनी केली. फैजुल्ला मुसलमान माथेफिरू असल्याचा कांगावा पोलीस व मुसलमान यांनी केला. `त्याने मुसलमानाचे घर अथवा मशिदीत का तोडफोड केली नाही ? इतर पुतळयांना का हात लावला नाही ?', अशा प्रश्‍नांचा भडीमार करून हिंदुत्ववाद्यांनी फैजुल्ला धर्मांधच आहे, हे पोलिसांना पटवून दिले. पोलिसांनी `फैजुल्लावर निष्पक्षपणे कारवाई करण्यात येईल', असे आश्‍वासन दिल्यानंतर हिंदुत्ववादी पुन्हा चौकात आले. सकाळी १० वाजेपर्यंत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हिंदुत्ववाद्यांनी दिला. त्याचाच परिणाम म्हणून आज दिवसभर उंचगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. कोल्हापूर शहरात हिंदुत्ववाद्यांच्या मोठ्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.